अनिल देशमुखांनी चौकशीला समोरे जाणेच योग्य : देवेंद्र फडणवीस

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

अनिल देशमुखांनी चौकशीला समोरे जाणेच योग्य : देवेंद्र फडणवीस

नागपूर : खंडणी आरोप प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरूद्ध ईडीने लूकआऊट नोटीस बजावल्याचे माध्यमातूनच कळले. या प्रकरणी आता उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय असा सर्व प्रवास झाला असल्याने कायद्याच्या दृष्टीने अनिल देशमुख यांनी चौकशीला समोर जावे हेच योग्य होईल, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज, सोमवारी नागपुरात केले.
धनंजय मुंडेंची दुसरी पत्नी करूणा शर्मा संदर्भात फडणवीस म्हणाले की, या प्रकरणात सखोल चौकशी झाली पाहिजे. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. आणि बोलण्यापासून कोणाला वंचित ठेवण्याचा कारण नाही. तिथे घडलेल्या घटनेवरून कायदा आणि सुव्यवस्था कशा स्वरूपात ठेवली जात आहे हे स्पष्ट होत आहे. करुणा शर्मा प्रकरणी निष्पक्ष चौकशी झालो पाहिजे. गाडीत बंदूक मिळणे आणि बंदुक ठेवल्याचा व्हिडीओ आणि नंतर मिळालेले पिस्तुल हे सर्व गंभीर आहे. दबावाविना चौकशी झाली पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमिवर गणेशोत्सवात सतर्कता बाळगण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे, याकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्री काय बोलले याच्यावर बोलणार नाही. त्यांनी आपल्या सोबतच्या आणि पक्षातल्या लोकांना आधी बोलावे नंतर आम्हाला बोलावे, असे फडणवीस म्हणाले. एमव्हीए आघाडी उत्तम सरकार देण्यासाठी नव्हे तर सत्तेचे लचके तोडण्यासाठी झाली आहे. प्रत्येक जण लचके तोडण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि ते जमले नाही झाले तर आपसात लचके तोडा असे त्यांचे सुरू असल्याची टीका फडणवीस यांनी केली.