जागतिक आरोग्य संघटनेने मानले भारताचे आभार
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली, 22 सप्टेंबर (हिं.स) जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत पुन्हा एकदा लसींचा पुरवठा विदेशात करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे महासचिव टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांचे कौतुक करीत त्यांना धन्यवाद दिले.
आपल्या भावना ट्वीटर द्वारे व्यक्त करताना महासचिव म्हणाले, " कोवॅक्स अभियानात ऑक्टोबर महिन्यात कोरोना लसींचा पुरवठा विदेशात पूर्ववत करण्यासाठी आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांना धन्यवाद. या वर्षाच्या शेवटी जगात 40% लसीकरणाचे लक्ष पूर्ण करण्यासाठी हे एक महत्वाचे पाऊल आहे. "