केंद्र सरकारच्या जमाखर्चाचा मासिक आढावा
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : केंद्र सरकारचे जुलै 2021 पर्यंतचे मासिक जमाखर्च एकत्रित करण्यात आले असून त्यांचे अहवाल प्रकाशित करण्यात आले आहेत.
अहवालातील ठळक मुद्दे
केंद्र सरकारला जुलै, 2021 पर्यंत 6,83,297 कोटी रुपये (एकूण प्राप्तीच्या संबंधित अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 34.6%) प्राप्त झाले. यात 5,29,189 कोटी रुपये कर महसुलाचे (निव्वळ केंद्राचा ), बिगर कर महसुलाचे 1,39,960 कोटी रुपये आणि 14,148 कोटी रुपये बिगर कर्ज भांडवलाचा समावेश आहे.
बिगर कर्ज भांडवल प्राप्तीमध्ये 5,777 कोटी रुपये कर्ज वसुलीचा आणि 8,371 कोटी रुपये निर्गुंतवणुकीचा समावेश आहे. जुलै, 2021 पर्यंत 1,65,064 कोटी रुपये केंद्र सरकारद्वारे करांच्या हिश्श्याचे वितरण म्हणून राज्य सरकारांना हस्तांतरित करण्यात आले आहेत.
केंद्र सरकारचा एकूण खर्च 10,04,440 कोटी रुपये (संबंधित अर्थसंकल्पीय खर्च 2021-22 च्या 28.8%) असून त्यापैकी 8,76,012 कोटी रूपये महसुली खर्चाचे आणि 1,28,428 कोटी रुपये भांडवली खर्चाचे आहेत. एकूण महसूली खर्चापैकी, 2,25,817 कोटी रुपये व्याज देय आणि 1,20,069 कोटी रुपये प्रमुख अनुदानांचे आहेत.