अनिल देशमुखांसह राज्य सरकारला उच्च न्यायालयाचा दणका,
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्य सरकार या दोघांच्याही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी देशमुखांनी याचिका केली होती ही फेटाळण्यात आली आहे. तर अनिल देशमुख प्रकरणामध्ये दाखल गुन्ह्यातील दोन मुद्दे वगळावे या मागणीसाठी राज्य सरकारकडून याचिका करण्यात आली होती ती देखील उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे अनिल देशमुखांसह ठाकरे सरकारलाही हा मोठा धक्का मानला जात आहे.
अनिल देशमुख यांनी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यावरच आक्षेप घेतलेला होता. यासोबतच महाराष्ट्र सरकारने त्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्या, यासोबतच सचिन वाझे यांच्याबाबतच्या उल्लेखावर आक्षेप घेतला होता. हा भाग एफआयआरमधून वगळण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयालाकडे केली होती. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमधल्या दोन परिच्छेदांमध्ये यासंदर्भातले उल्लेख करण्यात आले होते. मात्र, न्यायालयाने या दोन्ही याचिका फेटाळून लावल्या आहेत. यामुळे हा अनिल देशमुखांसह राज्य सरकारसाठी देखील हा धक्का मानला जात आहे. त्यामुळे आता या प्रकरणात सखोल चौकशी करण्यासाठी सीबीआयचा मार्ग मोकळा झाला आहे.