कांगोमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक; 15 जणांचा मृत्यू; भारतीय लष्कराने वाचवले नागरिकांचे प्राण
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
गोमा, २४ मे, (हिं.स.) : कांगोतील गोमा शहरानजीक असणारा ज्वालामुखी माऊंट नीरागोंगोचा उद्रेक झाला असून
यात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, यात 500 हून अधिक घरे नष्ट झाली आहेत, अशी माहिती अधिकारी
आणि प्रत्यक्षदर्शींनी दिली.
तब्बल 5 हजार नागरिकांना गोमा सोडत स्थलांतरीत व्हावे लागले. तर, इतर 25 हजार नागरिकांनी येथील उत्तर
पश्चिमेकडे असणाऱ्या साके शहरात शरण घेतली, अशी माहिती युनिसेफकडून देण्यात आली. ज्वालामुखीचा
उद्रेक झाल्यानंतर लाव्हारस बाहेर पडण्यास सुरुवात झाली. क्षणार्धात धगधगत्या लाव्हारसने सर्वकागी गिळंकृत
करण्यास सुरुवात केली. ज्वालामुखाचा उद्रेक झाल्याने शहरातले नागरिक दहशतीमध्ये होते. जीव वाचवण्याच्या
आक्रोशाने एकच गोंधळ झाला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
दरम्यान, सदर संकटात भारतीय लष्कराने अभिमानास्पद कामगिरी केली. संयुक्त राष्ट्राच्या अभियानाच्या
अंतर्गत भारतीय लष्कराची तुकडी कांगोमध्ये तैनात असून ज्वालामुखीच्या वेढ्यात अडकलेल्या नागरिकांचे प्राण
भारतीय लष्कराने वाचवले. भारतीय लष्कराने या बिकट परिस्थितीमध्ये जीवाची बाजी लावून काम करत शहरात
अडकलेले संयुक्त राष्ट्राचे कर्मचारी आणि अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.