रुग्णदुपटीचा कालावधी ५०० दिवसांवर

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

रुग्णदुपटीचा कालावधी ५०० दिवसांवर

मुंबई : मुंबईत गुरुवारी ९६१ नवीन रुग्णांची नोंद झाली तर २७ रुग्णांचा मृत्यू झाला. तर एका दिवसात ८९७ रुग्ण
करोनामुक्त झाले. मुंबईतील रुग्णवाढीचा दर ०.१३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. तर रुग्णदुपटीचा कालावधी
५०० दिवसांपर्यंत वाढला आहे.
गुरुवारी ९६१ नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधितांची संख्या ७ लाख ८ हजारापुढे गेली आहे. एका
दिवसात ८९७ रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत ६ लाख ७५ हजाराहून अधिक  म्हणजेच ९५ टक्के रुग्ण करोनामुक्त
झाले आहेत.  त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या चांगलीच घटली आहे. सध्या १६ हजार ६१२ उपचाराधीन रुग्ण
आहेत.
करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे मुंबईतील चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले होते. बुधवारी २४ हजार ६६७
चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी चार टक्क्यांपेक्षा कमी नागरिक बाधित आढळले आहेत. आतापर्यंत ६३
लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.  मुंबईतील रुग्णवाढीचा दर  ०.१३ टक्क्यांपर्यंत खाली आला
आहे. रुग्ण दुपटीचा कालावधीही ५०० दिवसांवर पोहोचला आहे.
गुरुवारी २७  रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे मृतांची एकू ण संख्या १४ हजार ९६५ झाली आहे. २७ रुग्णांपैकी
१८ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये १८ पुरुष व ९ महिला होत्या. एका रुग्णाचे वय ४० वर्षांखाली होते.
२० रुग्णांचे वय ६० वर्षांवर होते, तर ६ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते.