महागाईचा फटका : चौथ्यांदा पेट्रोल-डिझेल महाग झाले, देशातील 26 राज्यांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या पुढे
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
भारतीय तेल कंपन्यांनी आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आज दिल्लीत डिझेलच्या दरात 30 पैशांनी आणि पेट्रोलच्या दरात 25 पैशांनी वाढ केली आहे. यानंतर येथे पेट्रोल 102.70 रुपये आणि डिझेल 91.13 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे. या महिन्यात चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. देशातील 26 राज्यांमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रति लीटर पार गेले आहे.
80 डॉलरच्या पुढे गेले कच्चे तेल
ओपेकच्या (OPEC) सदस्य देशांच्या कालच्या बैठकीत अपेक्षेप्रमाणे काही मिळाले नाही. कच्च्या तेलाची मागणी जसजशी वाढत आहे, तसतसे त्याचे उत्पादनही होईल अशी अपेक्षा होती. पण ओपेकने दररोज केवळ चार लाख बॅरल्सने उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सुमारे अडीच टक्क्यांनी वाढले आहेत. मार्केट बंद झाल्यावर, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 81 च्या वर गेला. तज्ञांच्या मते, कच्चे तेल $ 90 पर्यंत जाऊ शकते.
येत्या काही दिवसात किंमती आणखी वाढू शकतात
अनुज गुप्ता, उपाध्यक्ष (कमोडिटी अँड करन्सी), IIFL सिक्युरिटीज म्हणतात की, कच्च्या तेलाची मागणी वाढल्यामुळे येत्या काळात ते $ 80 पर्यंत जाऊ शकते. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 2 ते 3 रुपयांनी वाढू शकतात.