मुंबईतील निर्बंध कधीपर्यंत शिथिल होणार?
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत आहे. मात्र, रुग्णसंख्या थोडी वाढली तरी पुरेशा खाटा आणि अन्य सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे मुंबईतील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करावेत, अशी मागणी होत आहे. पालिकेने देखील राज्य सरकारच्या आरोग्य विभागाबरोबरच्या बैठकीत ही भूमिका मांडली होती. या पार्श्वभूमीवर मुंबईत निर्बंध शिथिल करण्यासंबंधी पालकमंत्री अस्लम शेख यांनी मोठं विधान केलं आहे. करोनामुळे मुंबईत अजूनही काही प्रमाणात निर्बंध कायम आहेत.
दरम्यान, ७० टक्के लसीकरण पुर्ण होत नाही. तोपर्यंत सर्वकाही सुरु करु शकत नाही, असे विधान पालकमंत्री अस्लम शेख यांनी केले आहे. तसेच ७० टक्के लसीकरण झाल्याशिवाय लोकल सुद्धा सुरु करता येणार नाही. याशिवाय त्यांनी मुंबईसह नजीकच्या शहरात लसीकरण करणं गरजेचं असल्याचे,अस्लम शेख म्हणाले.
अस्लम शेख म्हणाले, “जोपर्यंत लसीकरण ६० ते ७० टक्के पुर्ण होत नाही. तोपर्यंत सर्व खुलं करणं योग्य ठरणार नाही. जशी-जशी सुट देता येईल ते आम्ही देतचं असतो. तसेच आम्ही जे पाऊलं उचलतोय ते योग्य उचलतोय, असे सुप्रिम कोर्टाने देखील सांगितले आहे.”
केंद्र सरकारवर केली टीका
मुंबईत लसीकरणाचा वेग मंदावला आहे. आज लसीकरण देखील थांबलेले आहे. यावर अस्लम शेख म्हणाले, “लसीकरणाबाबत केंद्र सरकारचे नियोजन आणि अमलबजावणी पुर्णपणे फेल झालं आहे. मुंबईत आम्हाला २० दिवस लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागले. केंद्र सरकार स्वता लसी देऊ शकत नाही. आमच्याकडे पैसे असूनही आम्हाला लसी खरेदी करता येत नाहीत. त्यामुळे आम्ही केंद्राला निवेदन दिलं की, जगात ज्यांनी लस बनवली आहे. त्यांना भारतात आणा. बाकी सगळे राज्य देखील लस घ्यायला तयार आहेत. सरसकट सगळ्यांचं लसीकरण झालं तर लवकरात लवकर आपला देश उघडता येईल”