भारताच्या धोरणानंतर ब्रिटनने नागरिकांना क्वारंटाईन करण्याची अट केली रद्द
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली, : भारताच्या जशास तसेच्या धोरणानंतर ब्रिटननेही आपली भारतीय प्रवाशांसाठी लस घेतल्यानंतर क्वारंटाईन करण्याची अट रद्द केली आहे. भारतीय प्रवाशांनी कोविशील्ड किंवा सरकारने मंजूर केलेल्या इतर कोणत्याही लसीचे दोन्ही डोस घेतले असले तर त्यांना ११ ऑक्टोबरपासून क्वारंटाईन ठेवणार नाही, असे ब्रिटनने स्पष्ट केले आहे.मात्र त्यांनी भारताच्या स्वदेशी करोना लस प्रमाणपत्राबद्दल मौन बाळगले आहे.
दरम्यान ब्रिटनने सुरुवातीला ‘कोविशिल्ड’लसीला नकार दिला होता. तसेच भारतीय नागरिकांसाठी आरटीपीसीआर चाचणी आणि दहा दिवसांचे विलगीकरण सक्तीचे करण्यात आले होते. त्यानंतर भारतानेही ब्रिटिश नागरिकांसाठी नियमावली लागू केली आहे. जशाच तसेच्या या धोरणानंतर ब्रिटननेही माघार घेत आपल्या अटी शिथील केल्याचे दिसून आले.