इंधन दरवाढीचा भडका

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

इंधन दरवाढीचा भडका

दिल्ली : दिवसेंदिवस अधिकच महाग होत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सामान्य माणसाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आज सलग ९व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले ​​आहेत. आज दिल्लीत पेट्रोलच्या किंमतीत ३० पैसे प्रति लीटरने वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर आज डिझेलच्या किंमतीत ३५ पैसे प्रति लिटरने वाढ करण्यात आली आहे.

IOCL च्या वेबसाईटनुसार, देशाची राजधानी दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत १०३.८४ रुपये आणि डिझेल ९२.४७ रुपये प्रति लीटरवर पोहोचली आहे. त्याचबरोबर मुंबईत आज डिझेलने १०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे

मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू -काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलचे भाव 100 रुपयांच्या पुढे गेले आहेत. मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत. राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत फरक कर आणि केंद्र आणि राज्य सरकारने लादलेल्या वाहतुकीच्या किंमतीमुळे बदलतो

 ...