बुडापेस्ट टेबल टेनिस स्पर्धा : मनिका उपांत्य फेरीत पराभूत

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

बुडापेस्ट टेबल टेनिस स्पर्धा : मनिका उपांत्य फेरीत पराभूत

भारताच्या मनिका बत्राला शनिवारी ‘डब्ल्यूटीटी’ कंटेंडर बुडापेस्ट आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे मिश्र दुहेरीसह महिला एकेरीचे विजेतेपद मिळवण्याचे तिचे स्वप्न भंगले.

रशियाच्या एलिझाबेथ अब्रामिनने मनिकाला उपांत्य फेरीत ४-० (१२-१०, ११-९, १२-१०, ११-८) असे पराभूत केले. अंतिम फेरीत एलिझाबेथसमोर झियॉन यांगचे आव्हान असेल. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये मनिकाने तिसऱ्या फेरीपर्यंत मजल मारली होती. मनिका आणि ज्ञानशेखरन साथियन या जोडीने शुक्रवारी मिश्र दुहेरीचे विजेतेपद मिळवण्याची किमया साधली.

‘‘मिश्र दुहेरीनंतर एकेरीचे विजेतेपद मिळवले असते, तरी माझा आनंद द्विगुणीत झाला असता. परंतु एलिझाबेथने माझ्यापेक्षा उत्तम खेळ केला. आता आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या आव्हानासाठी मी सज्ज होणार आहे,’’ असे मनिका म्हणाली.