माजी फुटबॉलपटू चंद्रशेखर मेनन यांचे वृद्धापकाळाने निधन
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
कोची : भारताचे माजी फुटबॉलपटू ओ. चंद्रशेखर मेनन यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते मृत्यूसमयी त्यांचे वय ८५ वर्षे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते विविध आजारांनी ग्रस्त होते. त्या दरम्यान कोची येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
क्रीडा कारकीर्द
चंद्रशेखर यांनी १९६२च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेत्या भारतीय फुटबॉल संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. चंद्रशेखर यांनी भारतीय संघाचे नेतृत्वपदही भूषवले होते. १९६०च्या रोम ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय संघाचे ते सदस्य होते. १९५८ ते १९६६च्या काळात एकूण २५ सामन्यांत त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. स्थानिक फुटबॉलमध्ये १९५९ ते १९६५ या कालावधीत त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले. चंद्रशेखर यांचा जन्म १० जुलै १९३६ रोजी केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील इरिंजालकुडा येथे झाला होता. पुढे एर्नाकुलमच्या महाराजा कॉलेजमध्ये आपल्या फुटबॉल कौशल्याचा सन्मान केला.