मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावली पाहिजे, देवेंद्र फडणवीस संतापले
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
राज्यात अनलॉकसंबंधी झालेल्या गोंधळावरुन राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र
फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना
शिस्त लावली पाहिजे अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. मंत्र्यांनी
धोरणात्मक निर्णय विचार करुन जाहीर करावेत असा सल्लाही त्यांनी दिला आहे. ते मुंबईत
आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
ज्या मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे त्यांच्याकडून कोणतंही वक्तव्य येत नाही आणि त्याआधी पाच
मंत्री बोलतात. प्रत्येक मंत्री जाहीर करतो आणि ही घोषणा मुख्यमंत्री करतील असं सांगतो.
प्रत्येक गोष्टीचं श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. काम करुन तरी ते श्रेय घ्यावं. त्यामुळे कालचा
गोंधळ जरा जास्तच झाला आहे. याआधीही अनेकदा गोंधळ झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या
मंत्र्यांना शिस्त लावली पाहिजे. बोलण्यावर बंधनं आणू नये पण किमान मोठ्या धोरणात्मक
निर्णयावर सरकारचं म्हणणं आहे ते स्पष्टपणे आणि थेट जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे,” अशी
मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. “गोंधळ इतका निर्माण झाला आहे की, लॉकडाउन आहे
की नाही यासंदर्भात अनेकांचे फोन आले. आमच्याकडेही त्याचं उत्तर नव्हतं. लॉकडाउनमुळे
सध्या लोकांमध्ये संभ्रम, उत्कंठा, निराशा आहे. त्यामुळे काल घोषणा झाल्यानंतर लोकांना
वाटलं झालं सुटलो. छोट्या दुकानदारांना निर्बंध संपले असं वाटलं. अनेक दुकानदारांचा ७ ते २ या
वेळेला विरोध असून ९ ते ४ करावी अशी मागणी आहे. त्यामुळे अनेकांची निराशा झाली.
सरकारनं या बाबतीत लक्ष देण्याची गरज आहे,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.