टेनिसपटू सानिया मिर्झाला 'यूएई'चा गोल्डन व्हिजा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

टेनिसपटू सानिया मिर्झाला 'यूएई'चा गोल्डन व्हिजा

नवी दिल्ली: भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाला संयुक्त अरब अमिरातीचा गोल्डन व्हिजा प्राप्त झाल्याची माहिती मिळतेय. सानियाला गोल्डन व्हिजा मिळाल्यानंतर आता ती यूएईमध्ये खेळाशी संबंधित कोणताही व्यवसाय करू शकते. सानिया व्यतिरिक्त तिचा पती शोएब मलिकलाही यूएईचा गोल्डन व्हिजा मिळाला आहे.

यूएई सरकारने 2019 साली आपल्या देशातील व्हिजामध्ये गोल्डन व्हिजाची भर टाकली. त्या माध्यमातून परदेशी नागरिकांना राष्ट्रीय प्रायोजकाविना देशात राहणे आणि व्यवसाय करण्याची मुभा दिली जाते. ही सुविधा पाच आणि दहा वर्षांसाठी दिली जाते. त्यानंतर त्याचे नूतनीकरणही केले जाते.  हैदराबादची रहिवासी असलेली सानिया मिर्झाने पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत 2010 साली लग्न केले होते. लग्नानंतर सानिया आणि शोएब हे दोघेही दुबईला राहू लागले. गोल्डन व्हिजा मिळाल्यानंतर सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी आनंद व्यक्त केला असून दुबईचे शेख मोहम्मद बिन राशिद यांचे आभारदेखील मानले आहेत.


यूएईचा गोल्डन व्हिजा मिळणारी सानिया तिसरी भारतीय
संयुक्त अरब अमिरातीचा गोल्डन व्हिजा मिळणारी सानिया मिर्झा आता तिसरी भारतीय व्यक्ती ठरली आहे. या आधी बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान आणि संजय दत्त या दोघांना यूएईचा गोल्डन व्हिजा मिळाला आहे.