स्वप्नील जोशीचं चाहत्यांना सरप्राइज

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

स्वप्नील जोशीचं चाहत्यांना सरप्राइज

आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता स्वप्नील जोशी आता एका वेगळ्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. अगदी बाल वयापासूनच स्वप्नीलने मराठीसह हिंदी मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. त्यानंतर आता स्वप्नीलने प्रेक्षकांना एक आनंदाची बातमी दिलीय.

स्वपीन जोशी प्रेक्षकांसाठी स्वत: ओटीटी प्लॅटफॉर्म घेवून येत आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मवर भारतीय प्रादेशिक भाषांमधील कार्यक्रमांची प्रेक्षकांसाठी खास मेजवानी असणार आहे. हिंदी, मराठी, बंगाली आणि प्रादेशिक भाषांमधील सिनेमा, वेब सीरीज आणि मालिका या ओटीटीवर पाहायला मिळतील. ‘टामोरा डीजीवर्ल्डया आपल्या कंपनीच्या माध्यमातून तो हे ओटीटी प्लॅटफॉर्म लॉन्च करत आहे. स्वप्नील जोशी आणि नरेंद्र फिरोदिया गेल्या दीड वर्षांपासून ओटीटी प्लॅटफॉर्मचा विचार करत होते.

स्वप्नील जोशीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांना दिलीय. या पोस्टमध्ये तो म्हणाला, “मार्च २०२० सालात आलेल्या करोनाच्या महामारीमुळे सगळं ठप्प पडलं. आता पुढे काय असे विचार सतत डोक्यात येत होते. अखेर दीड वर्षांनंतर त्या कायचं उत्तर मिळालं. माझी कंपीन टमोरा डीजीवर्ल्ड लवकरच प्रादेशिक ओटीटी प्लॅटफॉर्म घेऊन येत असल्याचं सांगताना खूप आनंद होतोय. होय तुम्ही बरोबर वाचलतं. आम्ही लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म घेऊन येत आहोत.” असं स्वपील म्हणाला.