हॅट्ट्रिक गर्ल’ वंदना कटारियाला मिळणार २५ लाख!
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आपल्या कामगिरीचा ठसा उमटवणारी भारतीय महिला हॉकीपटू वंदना कटारियाला उत्तराखंड राज्य सरकारकडून २५ लाख रुपये दिले जातील. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. मुख्यमंत्री म्हणाले, ”आम्हाला अभिमान आहे, की उत्तराखंडची मुलगी वंदना हिने टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाच्या उत्कृष्ट कामगिरीमध्ये मोठे योगदान दिले आहे.”
मुख्यमंत्री म्हणाले, ”लवकरच एक नवीन आणि आकर्षक क्रीडा धोरण राज्यात लागू केले जाईल. या धोरणात, विशेषतः आपल्या तरुणांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिभा विकसित करण्यासाठी योग्य आर्थिक प्रोत्साहन देण्याची तरतूद असेल.”
त्याचबरोबर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी वंदना कटारियाचे आणि महिला हॉकीच्या सर्व खेळाडूंना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन केले. त्यांनी सर्व खेळाडूंना मनोबल राखण्यास सांगितले. वंदनाच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे राज्याचा सन्मान आणि आदर वाढला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी टोक्योहून परतल्यावर वंदना यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेटण्यासाठी आमंत्रित केले.