भारतीय खेळाडू इंग्लंडमध्ये केवळ 3 दिवस क्वारंटाईन राहणार

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भारतीय खेळाडू इंग्लंडमध्ये केवळ 3 दिवस क्वारंटाईन राहणार

इंग्लंड दौर्‍यापूर्वी टीम इंडियाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. इंग्लिश क्रिकेट बोर्डाने (ECB)
बीसीसीआयचा 3 दिवसांचा कडक क्वारंटाईनचा प्रस्ताव मान्य केला आहे. आता विराट कोहलीच्या संघाला
इंग्लंडमध्ये अवघ्या 3 दिवसांसाठी कडक क्वारंटाईन नियमांचे पालन करावे लागेल. यानंतर, खेळाडू सराव करू
शकतील.
यामुळे खेळाडूंना न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम सामन्यापूर्वी सराव करण्यास
12 दिवसांचा अवधी मिळेल. ईसीबीने यापूर्वी बीसीसीआयला दहा दिवसांच्या कठोर क्वारंटाईन नियमांचे पालन
करण्यास सांगितले होते. यामुळे खेळाडूंना सरावासाठी केवळ 6 दिवसच मिळाले असते. अंतिम सामना 18 जून
रोजी साऊथॅम्प्टनच्या एजिस बाऊल येथे होईल.
मुंबईत क्वारंटाईन नियमांचे कठोर पालन करीत टीम
बीसीसीआय आणि ईसीबी मध्ये क्वारंटाईन नियमांबाबत बराच काळ चर्चा सुरू होती. भारतीय पुरुष आणि महिला
दोन्ही संघ 2 जून रोजी इंग्लंडला रवाना होतील. तत्पूर्वी टीम 19 मेपासून 2 आठवड्यांसाठी मुंबईत क्वारंटाईन
आहे. बीसीसीआयने कोणत्याही खेळाडूला मुंबईत सराव करण्याची परवानगी दिली नाही. यासोबतच वेळोवेळी
प्रत्येकाची टेस्ट करण्याचेही सांगितले आहे. या दौऱ्यापूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या खेळाडूला संघातून वगळण्यात यावे,
अशा कठोर सूचना बीसीसीआयने दिल्या आहेत.