भारतीय हॉकी संघाचे माजी खेळाडू उस्मान खान यांचे निधन
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली, : भारतीय हॉकी संघाचे माजी खेळाडू उस्मान खान यांचे कर्करोगामुळे निधन झाले. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून उस्मान हे कर्करोगाशी झुंज देत होते. मात्र, ती झुंज अपयशी ठरली. हॉकी इंडियाने उस्मान खान यांच्या निधनाची माहिती दिली. उस्मान खान यांच्या मागे तीन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.
डावे विंगर म्हणून उत्कृष्ट क्षमता असलेले खेळाडू म्हणून उस्मान यांची आठवण काढली जाईल. हॉकी इंडियाच्या वतीने आम्ही त्यांच्या कुटूंबीयांबद्दल शोक व्यक्त करतो. त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर देवो, असे हॉकी इंडियाचे अध्यक्ष ज्ञानेंद्रो निंगोमबाम म्हणाले.बराच काळ उस्मान खान यांनी राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये बंगालचे प्रतिनिधित्व केले. ते मदरासी आजम मैदानावर हॉकी खेळायचे. त्यानंतर तो कोलकाता येथे शिफ्ट झाले. कोलकाता येथे उस्मान खान हे कस्टम सेवेत सामील झाले. उस्मान कोलकाता कस्टमकडून खेळले.