शक्ती कायद्याच्या अभावामुळे नराधम बोकाळले
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
डोंबिवली : राज्याच्या गृहमंत्र्यांनी महिनाभरात शक्ती कायदा लागू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दीड वर्ष उलटले तरी अजूनही शक्ती कायदा आणू शकलेले नाही. शक्ती कायद्याची अंमलबजावणी झाली असती तर राज्यात नराधमांचा धाडस वाढलं नसतं. शक्ती कायद्यासाठी आम्ही सरकार सोबत आहोत. कायद्याद्वारे नराधमांची मुस्कटदाबी केली नाही तर स्वैराचार मोठ्या प्रमाणात वाढेल असे वक्तव्य विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी डोंबिवलीत केले.
शहरात अल्पवयीन मुलीवर नराधम तरुणांनी बलात्कार केल्याच्या घटनेबाबत माहिती घेण्यासाठी दरेकर डोंबिबली मानपाडा पोलीस ठाण्यात आले होते. यावेळी आमदार गणपत गायकवाड, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, जेष्ठ नगरसेवक राहुल दामले यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. याबाबत दरेकर म्हणाले, लॉक डाऊन काळात विद्यार्थ्यांच्या हातातील मोबाईलचे प्रमाण आणि वेळ वाढला. परिणामी विद्यार्थ्यांकडून त्यांना मानसिकतेवर परिणाम करणारे आणि समाज विघातक कृत्यांना उत्तेजना देणाऱ्या ॲप्सचा वापर वाढलाआहे. अशा विकृती वाढवणाऱ्या ॲपवर नियंत्रण ठेवण्याबाबत केंद्र शासनाला कळवले जाईल. हे ॲप लवकरात लवकर बंद करण्याची मागणी केली जाईल असे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, यासारख्या घटना रोखण्यासाठी कृती आराखडा या शहरासाठी तयार करावा. यात समुपदेशन, तंत्रज्ञान, एनजीओची मदत, खबऱ्यांसारखी यंत्रणा असावी. पोलिसांनी सतर्क रहावे. पोलिसांचा धाक आणि दरारा कमी पडत आहे. वाढणाऱ्या गुन्हेगारीला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे. एनजीओ राजकीय पक्ष पोलीस प्रशासन तज्ञ यांच्याशी व्यापक बैठक घेण्याची गरज आहे. बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेपेक्षा राजकारणात सरकारला जास्त रस आहे. सरकार स्वतःच्या भूमिकेशी ठाम नाही. राजकारणाने आरक्षण हा इतकच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या उडालेल्या बोजवाऱ्याबाबत बैठका घेणे गरजेचे आहे.