नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ३२ हजार ५३३ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत २५ हजार ९६९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये २ हजार ८९० ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ३ हजार ९३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण: नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २ हजार १९९, बागलाण ७८९, चांदवड ८१८, देवळा ६९३, दिंडोरी ९७६, इगतपुरी २९५, कळवण ६०२, मालेगाव ४१८, नांदगाव ५५१, निफाड १ हजार ३२१, पेठ ९८, सिन्नर १ हजार ४३२, सुरगाणा ३१९, त्र्यंबकेश्वर १९०, येवला २९६ असे एकूण १० हजार ९९७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १३ हजार २४४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ४९३ तर जिल्ह्याबाहेरील २३५ असे एकूण २५ हजार ९६९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ६२ हजार ४७२ रुग्ण आढळून आले आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९०.२५ टक्के, नाशिक शहरात ९२.९९ टक्के, मालेगाव मध्ये ८५.२७ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३.४३ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९१.७४ इतके आहे. मृत्यु : नाशिक ग्रामीण १ हजार ८९७ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ६९७ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २७७ व जिल्हा बाहेरील ९९ अशा एकूण ३ हजार ९७० रुग्णांचा मृत्यु झाला आहे.