राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी रुपाली चाकणकरांचे नाव चर्चेत
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई, १६ सप्टेंबर, (हिं.स.) : राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. महामंडळ वाटपात राज्य महिला आयोगासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याची माहिती आहे. महिला आणि बालकल्याण खाते काँग्रेसकडे असल्यामुळे राज्य महिला आयोग राष्ट्रवादीच्या वाट्याला येऊ शकते. आयोगाच्या अध्यक्षपदासाठी रुपाली चाकणकर आणि विद्या चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत.
रुपाली चाकणकर आणि विद्या चव्हाण या दोघीही महिलांच्या प्रश्नावर वेळोवेळी आवाज उठवत असतात. राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद रुपाली चाकणकर यांच्याकडे आहे. अत्यंत कमी वेळात महाराष्ट्रात राष्ट्रवादीची महिला आघाडी समर्थ करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे.
हिंदुस्थान समाचार