राज्यात दिवसभरात 3 हजार 933 रूग्ण करोनामुक्त

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

राज्यात दिवसभरात 3 हजार 933 रूग्ण करोनामुक्त

राज्यात दिवसेंदिवस करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. मात्र, अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत असून, करोनमधून मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही भर पडतच आहे. दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे होत असलेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. आज दिवसभरात राज्यात 3 हजार 933 करोनामधून बरे झाले असून, 3 हजार 286 नवीन करोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय, 51 करोनाबाधितांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे.राज्यात आजपर्यंत एकूण 63,57,012करोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण(रिकव्हरी रेट) 97.23 टक्के एवढे झाले आहे.

आता राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या 65,37,843 झाली आहे. राज्यात आजपर्यंत 138776 करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,78,19,385 प्रयोगाशाळा नमुन्यांपैकी 65,37,843 (11.31 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,58,653 व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात आहेत. तर, 1 हजा 462 व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण 38,491 अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.