आदिवासी पाड्यातील कामगारांना आणि रेल्वे स्थानकात बूट पॉलिश करणाऱ्यांना रेशन वाटप - आरएसपी युनिटचा माध्यमातून स्तुत्य उपक्रम
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
कल्याण : 1 मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस म्हणून महाराष्ट्र दिन व कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. निमित्ताने कोरोना दुसऱ्या लाटेत लॉकडाऊनमुळे नाका कामगार व खाजगी कामगार यांचे रोजगार बंद झाले याची दखल घेऊन जेसुस इज लाईफ ट्रस्ट, कामा असोसिएशन या संस्थेच्या वतीने कल्याण आंबिवली परिसरातील 300 कामगारांना आरएसपी युनिट कमांडर मणिलाल शिंपी यांच्या नेतृत्वाखाली, मनसेचे मोहने कल्याण विभागीय अध्यक्ष राहुल कोट, जेसुस लाईट ट्रस्टचे गौरव सचदेवा, गिरीश तेजवानी यांच्या हस्ते रेशन किट वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकावर बूट पॉलिश करणाऱ्या कामगारांना देखील रेशनचे वाटप करण्यात आले.
यात तांदूळ 5 kg, पीठ ५ kg, साखर एक किलो, दहा एक किलो, तेल, चहा पावडर, पोहे, साबण, असे 17 किलो वजनाचे रेशन किट तयार करून जेसुस इज लाइफ ट्रस्टच्या माध्यमातून आणि कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशनच्या माध्यमातून आरएसपी अधिकारी शिक्षक युनिट गेल्या 22 मार्च 2020 च्या पहिल्या लॉक डाऊन पासून या ट्रस्ट मार्फत रोज गरीब आणि गरजू लोकांना भोजन देखील दिले जात आहे.
कुर्ला विभागाच्या महिला उप समादेशक रेखा प्रभू यांच्या सौजन्याने कुर्ला विद्याविहार माटुंगा या स्थानकावरील बूट पॉलिश करणाऱ्या 40 कामगारांना रेशन किट वाटप करण्यात आले. या उपक्रमाबाबत स्टेशन मॅनेजर यांनी आरएसपी अधिकारी युनिटचे अभिनंदन केले.