राष्ट्रीय जलविद्युत उर्जा महामंडळाद्वारे विशेष लसीकरण मोहीम
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली, : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत केंद्रीय विद्युत तसेच नवीन आणि पुनर्नविकरणीय उर्जा राज्यमंत्री आर.के.सिंग यांनी केलेल्या सूचनेनुसार राष्ट्रीय जलविद्युत उर्जा महामंडळाने दिल्ली तसेच एनसीआर विभागातील उर्जा मंत्रालय तसेच त्या मंत्रालयाअंतर्गत कार्यरत केंद्र सरकारी उपक्रम आणि संस्थांच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. या भागातील वीज पुरवठा अखंडितपणे, अहोरात्र सुरु असण्याची खात्री मिळण्याच्या दृष्टीने उर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ही लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
शुक्रवारी भारतीय पुनर्नविकरणीय उर्जा विकास संस्था येथे नवी दिल्लीच्या अपोलो रुग्णालयांच्या सहकार्याने ही लसीकरण मोहीम राबविली. या मोहिमेत राष्ट्रीय जलविद्युत उर्जा महामंडळात विविध भागात कार्यरत 18 ते 44 वर्षे वयोगटातील एकूण 117 कर्मचाऱ्यांना कोव्हीशिल्ड लसीची पहिली मात्रा देण्यात आली.