मुंबईत करोना रुग्णसंख्येत मोठी घट
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : मुंबईत सोमवारी मोठय़ा प्रमाणात रुग्णघट झाली असून १९० नव्या रुग्णांची नोंद झाली तर दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाला.
मुंबईतील एकूण बाधितांची संख्या सात लाख ३९ हजार ५२६ झाली आहे. एका दिवसात २७१ रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या सात लाख १८ हजार ३५४ म्हणजेच ९७ टक्के झाली आहे. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही घट होऊन ती दोन हजार ७४९ वर आली आहे. रविवारी २६ हजार ४८४ चाचण्या करण्यात आल्या होत्या. मुंबईतील रुग्णवाढीचा दर ०.०४ टक्क्यांपर्यंत खाली आला असून रुग्ण दुपटीचा कालावधी १,९६६ दिवसांवर गेला आहे.
ठाणे जिल्ह्य़ात १३३ रुग्ण
ठाणे जिल्ह्य़ात सोमवारी १३३ करोना रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन जणांचा मृत्यू झाला. ठाण्यात ४२, नवी मुंबई २६, कल्याण-डोंबिवली २४, मिरा-भाईंदर १६, बदलापूर ११ ,अंबरनाथ सहा, उल्हासनगर आणि ठाणे ग्रामीणमध्ये प्रत्येकी चार रुग्ण आढळून आले. तर ठाणे, नवी मुंबई व मिरा-भाईंदरमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.
राज्यात ४,१४५ नवे रुग्ण
राज्यात दिवसभरात करोनाच्या ४,१४५ नव्या रुग्णांची नोंद झाली असून १०० जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात ५८११ रुग्ण करोनामुक्त झाले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या ६२ हजार ४५२ इतकी आहे. राज्यात गेल्या २४ तासांत अहमदनगरमध्ये ६६०, पुणे जिल्हा ४२६, पुणे शहर १४९, सोलापूर ५८४, सातारा ५३८, कोल्हापूर १९५, सांगली ३६४, सिंधुदुर्ग १००, रत्नागिरी येथे ११५ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली.