पालघरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के;
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
आज महाराष्ट्रातील पालघर शहरात भूकंपाचे सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आज सकाळी ११ वाजून ५७ मिनिटांनी हे धक्के जाणवले. ३.७ रिश्टर स्केल या भूकंपाची तीव्रता होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने ही माहिती दिली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
यापुर्वी मे महिन्यात पश्चिम महाराष्ट्रात साताऱ्यामधील काही भागांमध्ये सकाळी ९.१६ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.३ इतकी नोंदवण्यात आली होती.
पालघर परिसरातील भागामध्ये हा सौम्य धक्का जाणवला. यामुळे कोणतीही हानी किंवा धोका निर्माण झाला नसल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये अद्याप कोणतीही जीवित तसेच वित्तहानी झालेली नसल्याची माहिती मिळाली नाही.