फ्रेंच ओपन स्पर्धेतून नाओमी ओसाकाची माघार
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
पॅरीस : जपानची महिला टेनिसपटू नाओमी ओसाका जगातील अव्वल टेनिसपटूंमध्ये येते. नुकतेच तिने अमेरिकन ओपन 2020 आणि ऑस्ट्रेलियन ओपन 2021 या दोन्ही स्पर्धेत विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरलं. दरम्यान सद्या सुरु असलेल्या फ्रेंच ओपनमधून पहिल्या फेरीत विजय मिळवल्यानंतर नाओमीने तडकाफडकी माघार घेतली आहे. नुकतंच तिला 15 हजार डॉलर्स अर्थात 10 लाख भारतीय रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. पहिल्या फेरीतील सामन्यानंतर माध्यमांशी बोलणे टाळल्याने हा दंड ठोठावला असून आता नाओमीने त्याच घटनेनंतर मानसिक आरोग्याचा मुद्दा देत माघार घेतली आहे. स्पर्धेतून माघार घेत नाओमीने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. ज्यात तिने लिहिलय. 'मी काही दिवसापूर्वी माध्यमांशी बोलणार नसल्याचं सांगितलं होत तेव्हा अशी परिस्थिती येईल असं मला वाटलं नव्हतं. स्पर्धा सुरुळीत चालावी आणि इतर खेळाडूंचे लक्ष विचलित होऊ नये म्हणून मी स्पर्धेतून माघार घेत आहे. मी जास्त बोलकी नसल्याने प्रसारमाध्यमांशी बोलल्याने मला मानसिक ताण येतो. ज्याचा परिणाम माझ्या खेळावर होतो. म्हणूनच मी माध्यमांशी बोलणे टाळत होते. पण माझा संदेश योग्यरित्या पोहोचला नाही. त्यामुळे अशी परिस्थिती आली. माझ्यासाठी मानसिक आरोग्यही तितकच महत्त्वाचं असल्याने मी माघार घेत आहे लवकरच परत भेटू.' नाओमीने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तिने पॅरिसमधील पत्रकारांची माफी मागितली. 'मी एक बोलकी व्यक्ती नसल्याने मला माध्यमांशी बोलणे जड जात होते. त्यामुळे माझ्या निर्णयामुळे मी ज्या पत्रकारांना दुखावलं त्यांची मी माफी मागते.' असं लिहिलं आहे. फ्रेंच टेनिस फेडरेशनचे अध्यक्ष गिलेस मोरेटन यांनी नाओमीच्या स्पर्धेतून माघार घेण्यावर प्रतिक्रिया दिली. नाओमीच्या या निर्णयाचा आम्हाला त्रास झाला असून आम्ही याबद्दल माफी मागतो असं मोरेटन यांनी म्हटलं आहे.