राज्यांना 31.83 कोटींपेक्षा अधिक लसींच्या मात्रांचा पुरवठा
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : देशव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत मोफत आणि राज्यांकडून थेट खरेदी अशा दोन्ही माध्यमातून केंद्रसरकारने आतापर्यंत 31.83 कोटींपेक्षा जास्त लसींच्या मात्रा म्हणजेच 31,83,36,450 राज्य- केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध केल्या आहेत. सकाळी 8 वाजता उपलब्ध झालेल्या माहितीनुसार यापैकी वाया गेलेल्या मात्रा धरून 31,04,91,565 मात्रा वापरल्या गेल्या आहेत. राज्य-केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही 78 लाखांपेक्षा जास्त 78,44,885 मात्रांचा साठा उपलब्ध आहे. याशिवाय, 15,18,560 लसी पुरवठा प्रक्रियेत असून येत्या 3 दिवसात त्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध होतील.
हिंदुस्थान समाचार