दिल्लीत ड्रोन हल्ल्याची भीती, अलर्ट जारी
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : दिल्लीत स्वातंत्र्य दिनापूर्वी ड्रोनच्या माध्यमातून दहशतवादी हल्ल्याची भीती व्यक्त केली जातेय. दहशतवादी अशाप्रकारच्या हल्ल्याचे षडयंत्र आखत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेकडून प्राप्त झालीय. यापार्श्वभीवर दिल्ली पोलिसांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. गुप्तचर संस्थांकडून प्राप्त माहितीनुसार दहशतवादी 15 ऑगस्टपूर्वी ड्रोनच्या माध्यमातून दिल्लीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करू शकतात. विशेषत: 5 ऑगस्ट रोजी अशा हल्ल्याची शक्यता अधिक आहे. कारण, 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवण्यात आले होते. गुप्तरच संस्थांकडून प्राप्त इशाऱ्यानंतर दिल्ली पोलिसांनीही ड्रोन हल्ल्याचा सामना करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. दिल्ली पोलिस आणि इतर राज्यांतील पोलिसांना ड्रोन हल्ल्यांचा सामना करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. यात दोन स्तरांचे प्रशिक्षण आहे.पहिल्या प्रशिक्षणात सॉफ्ट किल आहे, ज्या अंतर्गत सामान्य ड्रोन पाहिल्यास कारवाई कशी करावी हे शिकवले गेले आहे. हार्ड किल असे दुसर्या प्रशिक्षणाचे नाव आहे, म्हणजे जर एखादे संशयास्पद ड्रोन किंवा उड्डाण करणारे उपकरण दिसले तर त्यावर कारवाई कशी करावी. नुकतेच दिल्लीचे पोलिस आयुक्त बालाजी श्रीवास्तव यांनीही उड्डाण करणारे हवाई परिवहन आणि ड्रोनसारख्या गोष्टींबद्दल अत्यंत सतर्क राहण्याचे आदेश दिले होते.
ड्रोन उडवण्यावर बंदी
स्वातंत्र्यदिन सोहळ्याची तयारी सुरु असताना दिल्ली पोलिसांनी उड्डाण करणाऱ्या सर्व उपकरणांवर बंदी घातली आहे. असामाजिक घटक आणि दहशतवाद्यांची धमकी लक्षात घेता दिल्ली पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार अशी माहिती आहे की दहशतवादी उडणाऱ्या उपकरणांच्या माध्यमातून सामान्य जनता, व्हीआयपी आणि मोठ्या महत्वाच्या इमारतींना लक्ष्य करू शकतात.