बॅटर म्हणून झाले फलंदाजाचे नामकरण
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
लंडन -क्रिकेटचे नियम तयार करणाऱ्या एमसीसीने (मेरिलीबोर्न क्रिकेट क्लब) आता यापुढे फलंदाजाला बॅटर असे संबोधले जाणार असे घोषित केले आहे. तसा नियमांत बदलही करण्यात आला आहे.
क्रिकेट नियमात बदल करत आता पुढील काळापासून बॅट्समनऐवजी जेंडर न्यूट्रल टर्मनुसार बॅटर किंवा बॅटर्स असे संबोधले जाणार आहे. या बदलाला एमसीसीच्या कायदा समितीनेही मान्यता दिली आहे.
जेंडर न्यूट्रल शब्दाचा वापर केल्याने क्रिकेट सर्वसमावेशक होईल. मात्र, फिल्डर आणि बॉलर या शब्दांवर कोणतीच हरकत नसल्याचेही एमसीसीने स्पष्ट केले आहे. एमसीसीने बदल करण्यापूर्वीपासून काही संस्था आणि माध्यमे तसेच काही समीक्षकही बॅटर असाच उल्लेख करत होते, असा दाखलाही एमसीसीने दिला आहे.
आयसीसीने हा बदल पुरुष क्रिकेटसाठी मान्य केला असून, महिला क्रिकेटपटूंना काय संबोधले जाणार, असा सवाल केला आहे.