वडिलांच्या आठवणीत रितेश-जेनेलिया भावूक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

वडिलांच्या आठवणीत रितेश-जेनेलिया भावूक

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज २६ मे रोजी जयंती आहे. त्यांच्या ७६व्या जयंती निमित्ताने मुलगा अभिनेता रितेश देशमुख आणि सून, अभिनेत्री जेनेलिया डिसुजाने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

रितेशने वडिलांसोबतचा लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यानेदेवा कृपा कर आणि घड्याळाचे काटे पुन्हा उलटे फिरव.. मला तुमची रोज आठवण येते बाबावाढदिवसाच्या शुभेच्छाया आशयचे कॅप्शन दिले आहे.

तर जेनेलियाने सासरे विलासराव देशमुख यांना मिठी मारतानाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो रितेश आणि जेनेलियाच्या लग्नातील आहे. हा फोटो शेअर करत तिनेवाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा.. आम्हाला रोज तुमची आठवण येते.. बापलेकीची ही मिठी चिरंतन राहीलया आशयाचे कॅप्शन दिले आहे. गेल्या वर्षी रितेशने वडिलांच्या ७५व्या जयंतीनिमित्त एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये विलासरावांच्या पोषाखाला बिलगून रितेश त्यांचे अस्तित्व जाणवून घेताना दिसत होता. रितेश देशमुख त्यावेळी भावनिक झाला असून डोळ्यावर अश्रू तरळताना दिसून येत होते.