मान्सून मुदतीच्या आठवडाभर आधी आल्याने छत्री उद्योग आशादायी
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
यंदा देशात मान्सून एका आठवडाआधीच दाखल झाल्याने छत्री उद्योगाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. यामुळे चांगला व्यवसाय होण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे छत्री उद्योगाच्या व्यवसायाला मोठा फटका बसला होता. वाहतुकीची समस्या आणि बाजार बंद झाल्याने सुमारे ७० टक्के माल गोदामात पडून होता. ऑल इंडिया अम्ब्रेला फेडरेशनच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य जयेश चोप्रा यांनी सांगितले की, कारखान्यांत तयार माल मान्सूनच्या आगमनापूर्वी ग्राहकांपार्यंत पोहोचावा यासाठी मार्च-एप्रिलदरम्यान किरकोळ बाजारात पाठवला जातो. गेल्या वर्षी उत्पादन नियमित पद्धतीने झाले. मात्र, अचानक कारोना महामारी आली.
मार्चअखेरच्या आठवड्यापासून देशव्यापी लॉकडाऊन लागू झाले. दुकाने, वाहतूक बंद होते. यामुळे जिथे माल दुकानांपर्यंत पोहोचला नाही तिथे छत्र्यांची मागणीही पूर्ण होऊ शकली नाही. संपूर्ण हंगाम हातातून गेला. ७० टक्के माल गोदामांत पडला. या पार्श्वभूमीवर या वेळी केवळ १०% छत्र्यांचे उत्पादन झाले. मार्च-एप्रिल आणि मे महिन्यात लॉकडाऊन लागले. आता अनलॉक होत आहे. सर्वकाही व्यवस्थित राहिल्यास अडकलेला माल बाहेर निघेल.
छत्रीवर जीएसटी १२% वरून घटून ५% करावा
छत्रीवर जीएसटी १२% आहे. कारण हा हंगामी व्यवसाय आहे. लहान प्रमाणात असतो आणि मोठ्या प्रमाणात रोजगार देतो. त्यामुळे आम्ही जीएसटी दर घटवून ५% करण्याची मागणी केली आहे. - जयेश चोप्रा, कार्यकारी मंडळ सदस्य, ऑल इंडिया अम्ब्रेला मॅन्युफॅक्चरिंग फेडरेशन
- 1,500 कोटी रुपये छत्री उद्योगाचा आकार
- 10-12 लाख लोकांना मिळाले काम
- 7-10 टक्के दराने वाढतोय दरवर्षी
या वर्षी ९०-१००% व्यवसायाची अपेक्षा
छत्री उद्योगाचा ८०% व्यवसाय जूनपासून ऑक्टोबरदरम्यान दक्षिण-पश्चिम मान्सूनवर अवलंबून असतो. ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये पूर्व-पश्चिम मान्सूनदरम्यान तामिळनाडू आणि गुवाहाटीत २०% छत्र्या विकतात. अनलॉकसोबत छत्री उद्योगाला ९० ते १०० टक्क्यांपर्यंत व्यवसाय होण्याची अपेक्षा आहे. - पंबोली मंगीला, संचालक, महाराष्ट्र अम्ब्रेला फॅक्टरी
कच्चा माल महाग झाला, मात्र किंमत वाढणार नाही
या वर्षी कच्च्या मालाची गुंतवणूक १५ टक्के वाढली आहे. मात्र, छत्र्यांच्या किमती वाढण्याची अपेक्षा नाही. याचे कारण,असे की या वर्षी उद्योजकांनी केवळ १० टक्केच उत्पादन केले आहे. उर्वरित मालाचे उत्पादन गेल्या वर्षी कमी किमतीवर झाले होते. व्यावसायिक कमी नफ्यावर व्यवसाय करत गेल्या वर्षीचा शिल्लक साठा काढू इच्छितात.