ऑक्सिजन एक्सप्रेस दुर्गापूरहुन चेन्नईकडे रवाना
For Printing Download Epaper from files section from bottom of this page

नवी दिल्ली : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाची वाढती तीव्रता आणि प्रसार लक्षात घेत प्राणवायूची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारद्वारे सुरु करण्यात आलेल्या प्राणवायू परिवहन उपक्रमाच्या अंतर्गत पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथून विशेष रेल्वे गुरुवारी सकाळी चेन्नईकडे झाली.
या संदर्भात ट्वीटर द्वारे अधिकृत माहिती देताना रेल्वे मंत्री पियुष गोयल म्हणाले, " प्राणवायूने भरलेले डबे घेऊन पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस दुर्गापूर येथून चेन्नईकडे रवाना झाली आहे. तमिळनाडूतील कोरोना रुग्णांना प्राणवायूचा अविरत पुरवठा होणार आहे." यावेळी गोयल यांनी एक विशेष चित्रफीत देखील प्रदर्शित करीत गाडीच्या गमनाची सूचना दिली.