धोनीने केली IPL मधील निवृत्तीसंदर्भातील घोषणा
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने पुढील वर्षीचा ‘आयपीएल’ हंगाम खेळून निवृत्ती पत्कारणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘आयपीएल’ कारकीर्दीतील अखेरचा सामना तो चेपॉक स्टेडियमवर खेळणार आहे. “निरोपाचा सामना पाहण्याची संधी चाहत्यांना नक्की मिळेल. २०२२ च्या हंगामात चेपॉकवर क्रिकेटरसिकांच्या साक्षीने मी अखेरचा सामना खेळेन,” असे धोनीने एका ऑनलाइन कार्यक्रमात सांगितले. पुढील लिलावात चेन्नईकडून कर्णधार धोनी, रवींद्र जडेजा आणि ऋतुराज गायकवाड या तिघांना संघात कायम ठेवण्यात येणार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली ११ वेळा चेन्नई सुपर किंग्जने प्लेऑफपर्यंत मजल मारली आहे. ४० वर्षीय धोनीने आत्तापर्यंत चेन्नई संघाने खेळलेल्या सर्वच आयपीएलच्या पर्वांमध्ये संघाचं नेतृत्व केलं आहे. धोनी हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे.