उत्तरप्रदेश : रस्ता अपघातात 18 जणांचा मृत्यू
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
बाराबंकी : उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यात मंगळवारी रात्री दीड वाजता भीषण अपघात झाला. भरधाव ट्रक्टरने एका बसला जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या या अपघातात 18 लोकांचा जागीच मृत्यू झाला. तर 15 लोक गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लखनऊ-आयोध्या राष्ट्रीय मार्गावर हा अपघात झाला. लखनऊच्या ट्रामा सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी रात्री दीड वाजता घडल्याची माहिती आहे. बस हरयाणाकडून बिहारकडे जात होती. तेव्हा रामसनेहीघाट भागात एक्सेल टुटल्यामुळे बस खराब झाली. दुरुस्त करण्यासाठी बस थांबवण्यात आली होती. तेवढ्यात वेगाने येणाऱ्या ट्रकने बसला धडक दिली आणि मोठा अपघात झाला. घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केले. या अपघातात मृत पावलेल्या कुटुंबीयांना पंतप्रधानांनी पीएमएनआरएफमधून 2 लाखाची आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.