संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची सूत्रे भारताच्या हाती
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
१५ सदस्यांच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे ऑगस्ट महिन्यासाठीचे अध्यक्षपद भारत १ ऑगस्टपासून स्वीकारले आहे. त्यानुसार सोमवारी सागरी सुरक्षा, शांतता आणि दहशतवाद प्रतिबंध अशा तीन महत्त्वाच्या विषयांवरील कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या सागरी सुरक्षेवर डिजिटल माध्यमाद्वारे चर्चा करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या (UNSC) सागरी सुरक्षेवर डिजिटल माध्यमाद्वारे चर्चा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चेच्या अध्यक्षपदी असणार आहेत. चर्चेचा विषय ‘समुद्री सुरक्षेला प्रोत्साहन देणे: आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज’ असा असणार आहे. पंतप्रधानांच्या कार्यालया माहितीनुसार, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या खुल्या चर्चेचे अध्यक्ष असलेले नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान असतील. सागरी गुन्हेगारी आणि असुरक्षिततेसोबत प्रभावीपणे लढण्यासाठी आणि सागरी क्षेत्रात समन्वय मजबूत करण्यासाठी या चर्चेवर लक्ष केंद्रित केले जाईल.
“या बैठकीला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सदस्य देशांचे राज्य आणि सरकार प्रमुख आणि संयुक्त राष्ट्र यंत्रणेतील उच्च स्तरीय तज्ञ आणि प्रमुख प्रादेशिक संघटना उपस्थित राहणार आहेत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने सागरी सुरक्षा आणि सागरी गुन्हेगारीच्या विविध पैलूंवर चर्चा केली आहे आणि अनेक ठराव पारित केले आहेत. सागरी सुरक्षेवर उच्चस्तरीय खुल्या चर्चेत एक विशेष अजेंडा म्हणून एकत्रपणे चर्चा केली जाईल अशी पहिलीच वेळ आहे,” असे पंतप्रधान कार्यालयाने रविवारी एका निवेदनात म्हटले.