ट्रक-जीप अपघातात 8 जणांचा मृत्यू
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
बंगळुरू : कर्नाटकात ट्रक आणि जीप यांच्यात झालेल्या भीषण रस्ता अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण गंभीर जखमी आहेत. चिक्कबळापूर जिल्ह्यातील चिंतामणी तालुक्यातील मरिनायकनहळी गेटनजीक ही दुर्घटना झाली. या अपघात इतका भीषण होता की जीपचा चुराडा झाला आहे. यासंदर्भातील माहितीनुसार, जीपची ट्रकला धडक झाल्यामुले भीषण अपघात झाला. यात 6 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचे उपचारादरम्यान निधन झाले. काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृताची संख्या आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. काही जखमींवर कोलार एसएनआर रुग्नालयात उपचार सुरु आहेत. तर गंभीर जखमींना बेंगळुरुमधील रुग्नालयात हलवण्यात आलेय. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. चिंतामणी ग्रामीण पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी चालकाला अटक केली आहे. अपघातग्रस्त जीपमध्ये चालकासह 17 जण प्रवास करत होते. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान जीप चालकाला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरु आहे.