पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले परिचारिकांचे कौतुक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले परिचारिकांचे कौतुक

नवी दिल्ली,  : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत जागतिक परिचारिका दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील  परिचारिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली तसेच त्यांच्या कार्याचे कौतुक केले. 

ट्वीटर द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस, हा कोविड -19 विरुध्द लढा देण्यासाठी आघाडीवर काम करणाऱ्या मेहनती आरोग्य-नर्सिंग कर्मचार्‍यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.निरोगी भारताबद्दल त्यांची कर्तव्यनिष्ठा, करुणा आणि बांधिलकी अनुकरणीय आहे."

हिंदुस्थान समाचार