डॉ जयशंकर यांनी घेतली गॉर्डन ग्रिली रॅडमन यांची भेट

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

डॉ जयशंकर यांनी घेतली गॉर्डन ग्रिली रॅडमन यांची भेट

क्रोएशिया : जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ सुब्रमण्यम जयशंकर यांनी क्रोएशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री गॉर्डन ग्रिली रॅडमन यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मान्यवरांनी विविध विषयांवर चर्चा केली.
यासंदर्भात ट्वीटरद्वारे डॉ सुब्रमण्यम जयशंकर म्हणाले, " क्रोएशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री गॉर्डन ग्रिली रॅडमन यांच्याशी फलदायी चर्चा झाली. भारत- क्रोएशिया द्विपक्षीय संबंधांवर, क्षेत्रीय आणि जागतिक विषयांवर सविस्तर आणि सखोल चर्चा झाली. गॉर्डन ग्रिली रॅडमन यांच्यासोबत कटिबद्धतेने कार्यरत राहून दोन्ही देशातील संबंधांना वेगळी उंची प्रदान करू. "