देशात गेल्या 24 तासात 4 लाखांहून अधिक नवे रूग्ण
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : भारतात सलग तिसऱ्या दिवशी 4 लाखांहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. गेल्या चोवीस तासांत देशात 4 लाख 14 हजार 188 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही काळजीचा विषय ठरत असून सलग ११ व्या दिवशी तीन हजारांहून अधिक बळींची नोंद झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासांत 4 लाख 14 हजार 188 नवे रुग्ण आढळले असून यासोबत एकूण रुग्णसंख्या 2 कोटी 14 लाख 91 हजार 598 वर पोहोचली आहे. दरम्यान 3915 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 2 लाख 34 हजार 83 जणांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. देशात सध्या कोरोनाचे 36 लाख 45 हजार 164 सक्रीय रुग्ण आहेत. दरम्यान गेल्या 24 तासांत 3 लाख 31 हजार 507 जणांना डिस्चार्ज मिळाला असून आतापर्यंत 1 कोटी 76 लाख 12 हजार 351 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत 16 कोटी 49 लाख 73 हजार 58 जणांचे लसीकरण झाले.