टोक्यो ऑलिम्पिक : भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राचा अंतिम फेरीत प्रवेश
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
टोक्यो : टोक्यो ऑलिम्पिकमधील भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. नीरजने पात्रता फेरीमध्ये फेकलेला भाला हा तब्बल ८६.६५ मीटरपर्यंत गेला आणि तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. बुधवारी पार पडलेल्या अ गटातील पात्रता फेरीमधील कामगिरीच्या जोरावर आणि ऑटोमॅटिक क्वालिफिकेशनच्या नियमांनुसार नीरजला थेट अंतिम फेरीत प्रवेश देण्यात आला आहे. अ गटामध्ये नीरज १५ व्या स्थानी होता. विशेष म्हणजे त्याने ही कामगिरी पहिल्याच प्रयत्न केली.
काय आहे नियम पुरुष भालाफेक स्पर्धेमध्ये ८३.५० मीटरपर्यंत भाला फेकणाऱ्या किंवा सर्वोत्तम १२ खेळाडूंना अंतिम फेरीत प्रवेश दिला जातो. नीरजने पात्रता फेरीमध्ये फेकलेला भाला हा तब्बल ८६.६५ मीटरपर्यंत गेला. पहिल्या अटीनुसार म्हणजे ८३.५० पेक्षा अधिक लांब भाला पोहोचल्याने त्याने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.
असे असले तरी हे उत्तम १२ खेळाडू गट अ आणि ब मधून एकत्रितपणे निवडले जातात. ब गटामधील स्पर्धा अजून बाकी आहे. तसेच अ गटामधील काही स्पर्धकही अजून शिल्लक आहेत. तरीही नीरजला त्याचा काही धोका नाही. ऑलिम्पिक स्टेडियममध्ये ७ ऑगस्ट रोजी पुरुष भालाफेक स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे.