कोरोना संकटात शिक्षकांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद : पंतप्रधान
For Printing Download Epaper from files section from bottom of this page

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षक बांधवांना शुभेच्छा दिल्या तसेच माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंती निमित्त आदरांजली अर्पण करीत अभिवादन आणि स्मरण केले.
ट्वीटरद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, " ज्यांनी नेहमीच तरुणांच्या बौद्धिक क्षमतांचा विकास करण्यात, त्यांना घडविण्यात मोलाची भूमिका बजावली आहे, अशा सर्व शिक्षक बांधवांना, शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा.
कोविड – 19 च्या काळात शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास ज्या पद्धतीने चालू ठेवला आहे, ते निश्चितच कौतुकास्पद आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करतो. त्यांची विद्वत्ता आणि देशाप्रती त्यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करतो. "