गांधीनगर : अमित शहांनी केली विविध कामांची पाहणी
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
गांधीनगर, : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत केंद्रीय गृहमंत्री आणि गांधीनगरचे खासदार अमित शाह दोन दिवसांच्या गांधीनगर दौ-यावर आहेत. यावेळी अमित शहांनी केली विविध कामांची पाहणी केली. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी गांधीनगर लोकसभा मतदारसंघात कोविड लसीकरण केंद्रांची पाहणी केली. शाह यांनी आपल्या दोन दिवसीय गुजरात दौऱ्याची सुरुवात करत अहमदाबादच्या बोडकदेव स्थित पंडित दीनदयाळ उपाध्याय सभागृहात सुरु करण्यात आलेल्या कोविड लसीकरण केंद्राला भेट देऊन देशभरात आजपासून केंद्र सरकार द्वारा सुरु करण्यात आलेल्या वॉक-इन लसीकरण व्यवस्थेचे उद्घाटन केले.
अमित शाह यावेळी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 135 कोटी लोकसंख्या असलेल्या देशातील सर्व नागरिकांच्या मोफत लसीकरणाचा खूप मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, ज्याची सोमवारपासून देशभरात अंमलबजावणी देखील सुरु झाली आहे.एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या देशात 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचा एक खूप मोठा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे असे शाह म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की भारत यापूर्वीच जगात सगळ्यांच्या पुढे होता, आता आपण याचा वेग अधिक वाढवू.शाह पुढे म्हणाले की, देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोरोना विरोधात लढ्याचा एक महत्वाचा टप्पा सुरु होत आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता की, 21 जूनपासून देशभरात 18 वर्ष आणि त्यापुढील वयोगटातील सर्व लोकांना केंद्र सरकार कडून निःशुल्क लस दिली जाईल आणि कोरोना लसीकरणाचा वेग वाढवला जाईल. अमित शाह म्हणाले की, आशा आहे की देशातील सर्व नागरिकांना कोरोनाविरोधात लढण्यासाठीच केवळ ही लस उपयुक्त ठरणार नाही तर त्यांचा बचाव करण्यामध्येही ही लस सक्षम असेल.