इंग्लंड दौरा कर्णधार& विराट कोहलीसाठी ठरणार लाभदायी
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतीय कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. या
दौऱ्यात भारतीय संघाला १८ ते २२ जून दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा
अंतिम सामना खेळायचा आहे. तसेच त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरदरम्यान इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची
कसोटी मालिका खेळायची आहे. त्यामुळे एकूण ६ कसोटी सामने या दौऱ्यात भारतीय संघ खेळताना
दिसेल. या सामन्यांमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीला काही खास विक्रम करण्याची संधी आहे.
सर्वाधिक सामन्यात नेतृत्त्व करणारा कर्णधार
विराटने आत्तापर्यंत भारताचे ६० कसोटी सामन्यात नेतृत्व केले आहे. त्यामुळे सध्या भारताकडून
सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत तो आणि माजी कर्णधार एमएस धोनी
संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आहे. धोनीनेही ६० कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. पण
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मैदानात कर्णधार म्हणून उतरताच विराट धोनीला या
यादीत मागे टाकेल. हा अंतिम सामना विराटचा कर्णधार म्हणून ६१ वा कसोटी सामना असेल.
सर्वाधिक विजय मिळवण्याच्या यादीत क्लाईव्ह लॉईडला मागे टाकण्याची संधी
विराट सध्या भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने ६० कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व
करताना ३६ सामन्यात विजय मिळवले आहेत. कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी सामने जिंकणाऱ्या
भारतीय कर्णधारांमध्ये तो अव्वल क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर २७ विजयांसह एमएस धोनी
आहे.