दीपिकाकुमारीची उपांत्य फेरीत धडक
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
टोकियो : जपान येथे सुरू असलेल्या ऑलम्पिक क्रीडा स्पर्धेत भारतीय तिरंदाज दीपिका कुमारीने रशियाच्या पेरोवा हिचा 6-5 ने पराभव करत इतिहास रचला आहे. याचबरोबरच दीपिकाने क्वार्टर फाइनलमध्ये जागा बनवली आहे. या सामन्याचा निर्णय शूट-ऑफ फेरीत आला जेव्हा दीपिकाने परिपूर्ण 10 लावून सामना जिंकला. दीपिका कुमारी ने माजी विश्वविजेती रशियन ऑलिम्पिक समितीची सेनिया पेरोवा हिला रोमांचक शूट आफमध्ये धूळ चारली आणि टोकियो ऑलिम्पिक महिला एकल वर्गच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.पाच सेटनंतर स्कोर 5-5 ने बरोबरीत होता. मात्र, दीपिकाने दडपणाशी झुंज देत, शूट-ऑफमध्ये 10 स्कोर केला आणि रिओ ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या खेळाडूला पराभूत केले. एका बाणाने शूट-ऑफमध्ये सुरुवात केल्यामुळे रशियन तिरंदाज दबावात आली आणि ती केवळ 7 इतका स्कोर करू शकली. तर दीपिकाने सामन्यासाठी 10 स्कोर केला.दीपिका कुमारी तिसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धा खेळत आहे. ती ऑलिम्पिकच्या तिरंदाजी स्पर्धेत अंतिम आठ खेळाडूंमध्ये समाविष्ट होणारी पहिली भारतीय तिरंदाज बनली आहे. या आधी दीपिकाने अंतिम 16 च्या सामन्यात अमेरिकेच्या जेनिफर फर्नांडेजला 6-4 ने पराभूत केले होते.