कोरोना लसीकरणात 84.89 कोटी मात्रांचा टप्पा पार
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : 24 तासात 71,04,051 मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण झाल्याने भारताने 84.89 (84,89,29,160) कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. सकाळी 7 वाजेपर्यंत 82,99,312 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत 28,046 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 3,28,76,319 झाली आहे.भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 97.78% झाला आहे. मार्च 2020 पासूनचा हा सर्वोच्च दर आहे. केंद्र आणि राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 90 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाल्याचा कल कायम राहिला आहे.
गेल्या 24 तासात 29,616 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,01,442 असून आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 0.90% आहे. देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 15,92,421 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 56.16 (56,16,61,383) कोटींहून अधिक चाचण्या घेतल्या आहेत. देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.99% असून गेल्या 92 दिवसांपासून हा दर 3% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.86% असून गेले सलग 26 दिवस हा दर 3 % पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 109 दिवस हा दर 5% पेक्षा कमी आहे. राज्यांना 82.57 कोटींपेक्षा अधिक लसी उपलब्ध