स्वित्झर्लंडमध्ये भारतीयांनी काळा पैसा ठेवल्याच्या वृत्ताचे अर्थ मंत्रालयाकडून खंडन
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली, : स्वित्झर्लंडमध्ये भारतीयांनी काळा पैसा ठेवल्याच्या माध्यमांमधील वृत्ताचे अर्थ मंत्रालयाने खंडन केले आहे. यासंदर्भात स्पष्टीकरण देताना अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, 18 जून रोजी माध्यमांमध्ये काही वृत्त प्रकाशित झाली आहेत ज्यात म्हटले आहे की, स्विस बँकांमधील भारतीयांच्या ठेवीत वाढ झाली असून 2019 अखेरच्या 6,625 कोटी रुपयांच्या (CHF 899 दशलक्ष) तुलनेत 2020 अखेर 20,700 कोटी रुपये (CHF 2.55 अब्ज ) इतकी झाली आहे.
त्याआधी 2 वर्षे यात घसरण झाली होती. गेल्या 13 वर्षातील या सर्वाधिक ठेवी असल्याचे यात नमूद केले आहे. बॅंकांनी स्विस नॅशनल बँकेकडे (एसएनबी) नोंदवलेली ही अधिकृत आकडेवारी असून स्वित्झर्लंडमध्ये जमा केलेला कथित काळा पैसा किती आहे हे यात दाखवलेले नाही या तथ्याचाही माध्यमांनी आडवळणाने उल्लेख केला आहे. शिवाय, या आकडेवारीत भारतीय, अनिवासी भारतीय किंवा इतरांनी स्विस बँकांमध्ये तिसर्या देशातील कंपनीच्या नावे जमा केलेल्या पैशाचा समावेश केलेला नाही.
मात्र , ग्राहकांच्या ठेवीत 2019 अखेरपासून खरोखरच घट झाली आहे. 2019 अखेरपासून विश्वस्तांच्या मार्फत जमा ठेवीही निम्म्यापेक्षा जास्त आहेत. सर्वात मोठी वाढ “ग्राहकांकडून थकित अन्य रक्कम ” मध्ये झाली आहे. ही रोखे, सिक्युरिटीज आणि इतर अनेक वित्तीय साधनांच्या स्वरूपात आहेत.