करोना लशींच्या १.७३ कोटी मात्रा राज्यांकडे शिल्लक
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : शिल्लक असलेल्या आणि वापरल्या न गेलेल्या मिळून करोना प्रतिबंधक लशींच्या १.७३ कोटींहून अधिक मात्रा अद्याप राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे उपलब्ध असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले. राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत सर्व माध्यमांतून करोना लशींच्या ३८.५४ कोटींहून अधिक मात्रा पुरवण्यात आल्या आहेत आणि वाया गेलेल्या लशी जमेला धरून ३६,८०,६८,१२४ मात्रा वापरण्यात आल्या आहेत.१.७३ कोटींहून अधिक (१,७३,३३,०२६) शिल्लक आणि वापरल्या न गेलेल्या करोना लशींच्या मात्रा अद्यापही राज्ये/ केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे उपलब्ध आहेत, असेही मंत्रालयाने सांगितले.
‘डेल्टा’मुळे जूनमध्ये रशियात अधिक बळी
मॉस्को : रशियाच्या करोना कृती दलाच्या मते यावर्षी जूनमध्ये बळी गेलेल्या करोनारुग्णांची संख्या डेल्टा विषाणूमुळे १४ टक्क्यांनी वाढली आहे. पपंतप्रधान तात्याना गोलिकोवा यांनी सांगितले, की सध्या आमच्या हाती जूनमधील जी माहिती हाती आली आहे त्याचा विचार करता डेल्टा विषाणूने १३.९ टक्के बळी गेले आहेत. रशिया करोना साथीशी जूनपासून लढत असून उन्हाळ्यात ९ हजार रुग्ण होते, ते आता २३ हजार झाले आहेत. शुक्रवारी कृती दलाने २५७६६ नवीन संसर्गांची नोंद केली असून साथीनंतर प्रथमच दैनंदिन मृत्यू दर हा ७०० च्या पुढे गेला आहे.