श्रीलंका दौऱ्यासाठी धवनकडे नेतृत्व; ऋतुराजला संधी
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
महाराष्ट्राचा प्रतिभावान फलंदाज ऋतुराज गायकवाडची आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी प्रथमच भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. जुलै महिन्यात श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी अनुभवी सलामीवीर शिखर धवन भारताचे नेतृत्व करणार असून मुंबईकर पृथ्वी शॉचेसुद्धा संघात पुनरागमन झाले आहे.
कोलंबो येथे उभय संघांत तीन एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-२० सामने खेळले जाणार आहेत. त्यासाठी चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समितीने २० जणांच्या भारतीय संघाची निवड केली. ‘आयपीएल’मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना २४ वर्षीय ऋतुराजने सातत्याने छाप पाडली. राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चेतन साकारियालादेखील प्रथमच भारतीय संघात स्थान लाभले आहे. इशान किशन आणि संजू सॅमसनकडे यष्टीरक्षणाची, तर भुवनेश्वर कुमारकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे,
भारतीय संघ :
शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंडय़ा, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), यजुर्वेद्र चहल, राहुल चहर, के. गौतम, कृणाल पंडय़ा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन सकारिया.