कोकणच्या पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी राणे-फडणवीस रवाना
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई, : जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत रविवारी सकाळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच प्रवीण दरेकर यांच्यासोबत मुंबईहून कोकणच्या पूरग्रस्त भागाची पाहणी आणि आढावा घेण्यास हवाई मार्गाने रवाना झाले. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने ट्वीटर द्वारे माहिती दिली.
तर ट्वीटर द्वारे माहिती देताना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, " माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संमतीने मी, देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्यासह रायगड जिल्ह्यातील तळये, रत्नागिरीतील चिपळूण येथील दुर्घटनाग्रस्त परिसराची पाहणी करण्यासाठी रवाना होत आहोत."